Mon, Jun 17, 2019 02:37होमपेज › Kolhapur › महापौर चषक हॉकी : कोल्हापूर पोलिस संघाला अजिंक्यपद

महापौर चषक हॉकी : कोल्हापूर पोलिस संघाला अजिंक्यपद

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 07 2018 1:49AMकसबा बावडा : प्रतिनिधी

महापौर चषक हॉकी स्पर्धेत टायब्रेकरवर कोल्हापूर पोलिस अ संघाने महाराष्ट्र क्रीडा मंडळचा 3- 2 असा पराभव करत अजिंक्यपद पटकावले. विजयी संघाला आ. सतेज पाटील, महापौर स्वाती यवलुजे यांच्या हस्ते 45,445 रुपये व चांदीचा फिरता चषक बक्षीस देण्यात आला. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र क्रीडा मंडळ व कोल्हापूर पोलिस यांच्यात अंतिम सामना रविवारी दुपारी लाईन बाजार हॉकी मैदानावर झाला. 

महाराष्ट्र क्रीडा मंडळ व कोल्हापूर पोलिस अ यांच्यातील अंतिम सामना निर्धारित वेळेत 2-2 असा बरोबरीत राहिला. पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्ये कोल्हापूर पोलिस अ ने 3-2 असा विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.कोल्हापूर पोलिस अ च्या मुकुंद रजपूत, उदयराज पाटील, सनी मोरे यांनी, तर महाराष्ट्र क्रीडा मंडळच्या पंकज पाटील, आशिष पाटील यांनी गोल नोंदवले.

स्पर्धावीर : पृथ्वीराज साळोखे - कोल्हापूर पोलिस, बेस्ट हाफ - आयुब पेंढारी, बेस्ट बॅक - संदीप सावंत,  बेस्ट गोलकिपर - कपिल भोसले, (सर्व कोल्हापूर पोलिस), सामनावीर - अनिकेत दळवी, बेस्ट फॉरवर्ड - अजित शिंदे (दोघे महाराष्ट्र क्रीडा मंडळ), उदयोन्मुख खेळाडू - तन्मय जाधव (पद्मा पथक), विश्‍वजित मेंगाणे (शाहू), ओंकार इंगळे (संयुक्‍त लाईन बाजार), शकिल शेख (छावा).

उपविजेत्या महाराष्ट्र क्रीडा मंडळला 21,221 रुपये व चषक बक्षीस देण्यात आले. उत्तेजनार्थ कोल्हापूर पोलिस ब, देवगिरी फायटर्स यांना गौरविण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवक, हॉकी असोसिएशन पदाधिकारी, हॉकीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.