होमपेज › Kolhapur › महापौरांचा १२ रोजी राजीनामा

महापौरांचा १२ रोजी राजीनामा

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 12:54AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापौर राजीनाम्यासाठी 11 डिसेंबरला होणार्‍या सर्वसाधारण सभेसाठी शनिवारी अजेंडा देण्यात आला आहे. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा होणार असून, याच सभेत महापौर राजीनामा देणार आहेत.  

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. पहिल्या वर्षी काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदा राष्ट्रवादीच्या सौ. हसिना फरास महापौर झाल्या. त्यांची मुदत 8 डिसेंबरला संपते.  

त्यानंतर काँग्रेसचा महापौर होणार आहे. मेनंतर पुढील अडीच वर्षे खुल्या प्रवर्गातील महिलासाठी महापौरपदाचे आरक्षण असल्याने आताच ओबीसी प्रवर्गातील नगरसेविकांनी फिल्डिंग लावली आहे.  उमा बनछोडे, स्वाती यवलुजे, दीपा मगदूम यासाठी आघाडीवर आहेत.शनिवारी दिवसभर सर्वसाधारण सभेबाबत उत्सुकता होती. अखेर नगरसचिवकांकडे सर्वसाधारण सभेचा अजेंडा पोहोचला आहे.