Thu, Feb 21, 2019 05:02होमपेज › Kolhapur › महापौर, उपमहापौरांची ‘पुढारी’स सदिच्छा भेट

महापौर, उपमहापौरांची ‘पुढारी’स सदिच्छा भेट

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 31 2018 12:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूरच्या नूतन महापौर सौ. शोभा बोंद्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांनी बुधवारी दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास सदिच्छ भेट दिली. ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापौर आणि उपमहापौरांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन शहरातील विविध विषयांवर चर्चा केली. महापौर सौ. बोंद्रे आणि उपमहापौर सावंत यांनी शहरातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘पुढारी’चे मोठे योगदान असल्याचे सांगून भविष्यातही विकासकांमाना निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि मार्गदर्शन करण्याची विनंती डॉ. जाधव यांना केली.

यावेळी थेट पाईपलाईन,  अंबाबाई विकास आराखडा, शिवाजी पूल, पंचगंगा प्रदूषण आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी महापौर, उपमहापौर यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महापालिका सभागृह नेता दिलीप पोवार, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती सौ. वनिता देठे, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका सौ. निलोफर आजरेकर उपस्थित होते.