Fri, Sep 21, 2018 09:26



होमपेज › Kolhapur › महापौर-उपमहापौरपदासाठी उद्या निवडणूक

महापौर-उपमहापौरपदासाठी उद्या निवडणूक

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 11:22PM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर महापालिकेच्या नूतन महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने स्वाती यवलुजे व विरोधी भाजपतर्फे मनीषा कुंभार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील व ताराराणी आघाडीकडून कमलाकर भोपळे यांनी अर्ज भरले आहेत. निवडीसाठी शुक्रवारी होणार्‍या महासभेत मतदान होईल. सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांची निवड निश्‍चित आहे. 

सौ. हसिना फरास व अर्जुन माने यांनी महापौर-उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक लागली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या विशेष सभेत निवडी होणार आहेत. कोणतीही रिस्क नको म्हणून सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक गोव्याला सहलीवर गेले आहेत. शुक्रवारी थेट महापालिकेतच ते येणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौरपद राखीव असून, 15 मेनंतर अडीच वर्षासाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी पद राखीव आहे. त्यामुळे यवलुजे यांना सुमारे साडेपाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.