Sun, Apr 21, 2019 14:30होमपेज › Kolhapur › शिवाजी पेठेत मटका अड्ड्यावर छापा

शिवाजी पेठेत मटका अड्ड्यावर छापा

Published On: Feb 28 2018 2:23AM | Last Updated: Feb 28 2018 2:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी पेठेतील वेताळ तालीम परिसरात घरात चालणार्‍या मटका अड्ड्यावर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. मुख्य बुकीमालक विजय लहू पाटील (वय 47, 
रा. हळदी, ता. करवीर) व 12 एजंटांना अटक केली. रोख  6 लाख 48 हजारांसह मोबाईल पोलिसांनी जप्‍त केले. भरवस्तीत बिनदिक्‍कत चालणार्‍या मटका अड्ड्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्‍त होत आहे. वेताळ तालमीनजीकच्या राऊत गल्‍लीत मटका एजंट दररोज एकत्रित जमत होते. या ठिकाणी विजय पाटील हा एजंटांकडून पैसे जमा करून घेत होता. याची माहिती उपअधीक्षक   भारतकुमार राणे यांना मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी राजवाडा पोलिसांच्या मदतीने त्यांनी छापा टाकला. मटका बुकीमालक विजय पाटील व 12 एजंट रंगेहाथ सापडले.

यामध्ये मकरंद मारुतराव मुदगल (54, देवकर पाणंद), समीर सुरेश नायर (40, न्यू शाहूपुरी), सतीश जयवंत माने (30, फुलेवाडी, रिंगरोड), योगेश आनंदराव पावले (36, कळंबा), विनायक राधाकृष्ण बागल (49, जयभवानी कॉलनी, फुलेवाडी), हेमंत बाबुराव घोरपडे (61, शाहू मिल कॉलनी), किशोर बाजीराव माळी (52, गणेश गल्‍ली, कदमवाडी), पांडुरंग दत्तात्रय चव्हाण (59, कांडगाव, करवीर), चंद्रकांत तुळशीदास माने (60, वाशी नाका), गौरव निरंजन खामकर (36, वेताळ तालीम परिसर), सचिन सुभाष पाटील (43, तस्ते गल्‍ली, मंगळवार पेठ), अब्दुल रशीदबाबू हुक्केरी (47, आर. के.नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र भूतकर, सचिन देसाई, रुपेश कुंभार, हणमंत कुंभार आदींनी कारवाईत सहभाग घेतला. पंधरा दिवसांपूर्वी सिद्धाळा गार्डन परिसरात पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने दोन मटका अड्ड्यांवर छापे टाकले होते. तर यापूर्वी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या पथकाने साकोली कॉर्नर येथील इमारतीवर छापा टाकून विजय पाटीलसह एजंटांना अटक केली होती.