Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 14 2018 11:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी

‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्‍काचं’ यासारख्या घोषणांनी बलभीम बँक चौक दणाणून गेला. शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट यांच्या वतीने मराठा आरक्षण मागणीच्या फलकाचे उद्घाटन वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण शिवाजी पेठवासीयांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 ऑगस्टला 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 25 ऑगस्टला सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पेठ येथे आरक्षणासाठी महाआरती करण्यात येणार आहे.

तुुतारीच्या निनादात फलक अनावरण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी जोरदार घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे,  राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा यावेळी जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे, पिंटू राऊत, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी उपमहापौर विक्रम जरग, रवि इंगवले, श्रीकांत भोसले, सुरेश जरग, सदाभाऊ शिर्के, अशोक देसाई,सुजित चव्हाण, अजित खराडे, राजू चोपदार, दिलीप सावंत, शिवाजी मोरे, शिवाजी जगदाळे, विजय माने, पप्पू नलवडे, सुनिल राऊत, सुनिल सरनाईक,ओंकार जोशी आदींची उपस्थिती होती.