Mon, May 20, 2019 22:27होमपेज › Kolhapur › मराठा क्रांती मोर्चा बंद :  जाणून घ्या आचारसंहिता 

मराठा क्रांती मोर्चा बंद :  जाणून घ्या आचारसंहिता 

Published On: Aug 09 2018 10:35AM | Last Updated: Aug 09 2018 10:35AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेला बंद सुरळीत व कोणतेही गालबोट न लागता पार पडावा यासाठी समन्वयकांकडून आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.

जाणून घेऊया काय आहे आचारसंहिता

बंदची वेळ सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे 
आत्महत्येसारखा कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये, आत्महत्येने कोणतीही समस्या सुटणार नाही
सोशल मीडियावरील बातम्यांची योग्य शहानिशा करावी 
पोलिसांना सुरक्षेसाठी सहकार्य करा, कोणतीही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करू नये 
कोणत्याही सार्वजनिक व सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नका 
अत्यावश्यक सेवांवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या 
सर्व जिल्हा तसेच तालुका स्तरावरील जबाबदार प्रतिनीधींनी कृती नियोजन करावे 
अफवांवर विश्वास ठेवू नका 
आपल्या लोकांना त्रास होईल असे कोणतेही गैरवर्तन करू नये