Sat, Feb 23, 2019 04:34होमपेज › Kolhapur › पानिपत येथे १४ जानेवारीला ‘मराठा शौर्य दिन’ साजरा होणार

पानिपत येथे १४ जानेवारीला ‘मराठा शौर्य दिन’ साजरा होणार

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 11:01PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

हरियाणामधील मराठा जागृती मंचतर्फे 14 जानेवारी रोजी पानिपत येथे 257 वा मराठा शौर्य दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. 

सोहळा श्रीमंत मुधोजीराजे भोसले (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली व भैयूजी महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कोल्हापूरबरोबर सातारा, सांगली, पुणे, मुंबई येथून शेकडो मराठा बांधव पानिपतकडे 10 जानेवारीला रवाना होणार आहेत. पानिपत येथे मराठा आणि अहमदशाह अब्दालीमध्ये झालेल्या युद्धास 257 वर्षे पूर्ण होत आहेत.

त्यानिमित्ताने युद्धातील सेनानींच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले जाते. 14 जानेवारी 2011 पासून पानिपत येथे शौर्यदिन साजरा केला जातो. पानिपतमधील युद्धामध्ये वाचलेल्या सैन्यांचे वंशज आज रोड मराठा म्हणून ओळखले जातात. त्यांची संख्या आज लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे रोड मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा बांधव एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. मराठा जागृती मंच हरियाणाचे सर्वेसर्वा मराठा वीरेंद्रसिंह वर्मा यांनी देशभरातील मराठा समाजाने या सोहळ्याला  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.