Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Kolhapur › मुस्लिम, लमाणसह विविध समाज बांधवांचा पाठिंबा

आरक्षणाच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 12:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘एक मराठा... लाख मराठा...’, आरक्षण आमच्या हक्‍काचे... नाही कुणाच्या बापाचे’ यासह विविध घोषणा देत मराठा समाजाला आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी सुरू असणार्‍या आंदोलनाला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी मुस्लिम, लमाण, बुद्ध, चर्मकार, कोळी अशा विविध जाती-धर्मांच्या समाज बांधवांनी मराठा समाजाला पाठिंबा देत, यासाठी सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आम्हीही मराठा समाज बांधवांच्या सोबत असल्याचे दाखवून दिले. 

जिल्ह्यातील कानाकोपर्‍यांतून तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे दसरा चौकाच्या दिशेने दिवसभर येऊन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सुरू असणार्‍या ठिय्या आंदोलनात सहभागी होत होते. बुधवारी समस्त मुस्लिम समाजाने दसरा चौकात ठिय्या मांडला. यामध्ये गणी आजरेकर, बंकट थोडगे, कादर मलबारी, आदिल फरास, बाळासाहेब मोमीन, फारूक कुरेशी, आजीज पठाण, प्रा. नागरजी, जहाँगीर अत्तार, उमराज मुजावर, फिरोजखान उस्ताद, नियाज खान, रफिक मुल्ला, इस्माईल शेख, फारूक अत्तार, प्रा. ए. डी. अत्तार, यासीम सनदी, अलताफ झांजी, अबीद अत्तार, अर्शदहुसेन अत्तार, फिरोज अत्तार, इर्शाद अत्तार आदी उपस्थित होते. 

शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनीही पाठिंबा देत ठिय्या मांडला.यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रज, शिवाजी जाधव, गजानन पोवार, दत्तात्रय टिपुगडे, कमलकार जगदाळे, रवी चौगले, अवधुत साळोखे, विराज ओतारी, तानाजी आंग्रे, शुभांगी पोवार, दिपली शिंदे, सुजाता सोहणी, कृष्णात पोवार, संदीप कारंडे, संभाजी भोकरे, विराज पाटील आदी उपस्थित हेाते.

लमान समाज संघटनेचे शंकर पवार, कोल्हापूर जिल्हा सहकारी पाणी पुरवठा संस्था मारूती पाटील, चंद्रकांत पाटील, विक्रांत पाटील, सखाराम पाटील, आर.के.पाटील,सुन्नत मुस्लीम समाज कसबा तारळे, भोगावती सहकरी पाणी पुरवठा संस्था दोनवडे,  यांनी पाठिंब्यांची पत्रे संयोजन समितीकडे दिली. ग्रामपंचायत उंचगाव च्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन मोर्चाने ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मालुबाई काळे, अनिल शिंदे, सतिश कुसळे, मधूकर चव्हाण, विजय यादव, दिनक पोवार, संदीप संकपाळ, कृष्णात संकपाळ, चंद्रकांत गायकवाड, अनिल यादव, विष्णू माने, मारूती माने, संदीप यादव,अनिल भोसले, सुरेश चौगले, हंबीरराव मुळीक, दिलीप चौगले, पप्पू माने, किरण सपाटे, विशाल पाटील, उत्तम मुळीक, प्रकाश माने, तुकाराम नाईक, नितीन निकम, सागर पाटील आदी उपस्थित होते.पिरवाडी ग्रामस्थांनी मोर्चाला पाठिंबा दिला.सरंपच अजित खोत, डे.सरंपच सात्ताप्पा लाड,बाजीराव जाधव उपस्थित होते. 

राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला.यावेळी किरण मांगुरे, आनंद गुरव, सुरेंद्र चौगुले, अशोक कावळे, बंडी रावळ, अरूण सावंत, बाळसाहेब पाटोळे, राजन यादव, प्रकाश डोंगळे, शितल कामत, प्रकाश पाटील, गजानन महाडिक, सुनिल बोगार, अशोक ओतारी, रमेश संकपाळ, अप्पासाहेब शिंदे, रविंद्र सरवडेकर, गणेश वाळवेकर, प्रदिप निळकंठ आदी उपस्थित होते. अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशने पाठिंबा दिला.यावेळी संजय नाळे, संजय चौगले, सुजर बोडके, अमोल पाटील, मिलिंद गावडे, राजाराम मगदूम, सतिश घाटगे, सुंदर तोरस्कर, अनिल तयशेटे,संतोष घोरपडे आदी उपस्थित होते.

शेतकरी संघ कर्मचारी संघटना

शेतकरी संघ कर्मचारी संघटनेच्या सभेत सकल मराठा क्रांती संघटनेच्या वतीने दसरा चौकात येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास जाहीर पाठिंबा व्यक्‍त करण्यात आला. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे सभापती राजेंद्र पाटील होते. यावेळी दीपक निंबाळकर, अनंत देसाई, संदीप खानविलकर, साताप्पा ठोणपे, पांडुरंग पोतदार, सचिन सरनोबत, पांडुरंग देवर्डेकर, धनाजी पाटील, संजय निर्मळ, बी. एस. पाटील, अशोक पाटील, सूर्यकांत लिमकर, अख्तर अत्तार, सौ. सुषमा गुरव, सौ. शैला पाटील आदी उपस्थित होते.