Tue, Apr 23, 2019 20:15होमपेज › Kolhapur › मराठा क्रांती मोर्चा : 31 रोजी मोटारसायकल रॅली

मराठा क्रांती मोर्चा : 31 रोजी मोटारसायकल रॅली

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यादिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात जनजागृतीसाठी दि. 31 जुलै रोजी मोटारसायकल रॅली काढून करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साकडे घालण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या रॅलीचा प्रारंभ सकाळी 11 वाजता कावळा नाका येथील ताराराणीच्या पुतळ्यापासून होणार आहे. ही रॅली दसरा चौक, सीपीआर मार्गे शिवाजी पुतळा येथून श्री अंबाबाईच्या मंदिरात नेण्यात येणार आहे. मंदिरात देवीचा गोंधळ घालण्यात येणार आहे.

भोसले म्हणाले, आजपर्यंत मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. यातूनही शासनाला जाग आली नाही. त्यामुळे आता ‘ठोक मोर्चा’ काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये शहरातील व्यापारी संघटना, वाहनधारक संघटनांनी व्यापार बंद ठेवून सहकार्य कारवे, अशी विनंती करण्यात येणार आहे. जिल्हा बंदच्या दिवशी दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात नेण्यात येणार आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे, पण बंदच्या दिवशी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्यात येर्ईल, असेही भोसले यांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेला मोहन मालवणकर, नितीन लायकर, संतोष कांदेकर, राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, सौ. सुनीता पाटील, निरंजन पाटील आदी उपस्थित होते.