शिवाजी विद्यापीठ कुलगुरू पदासाठी अनेक नावे चर्चेत

Last Updated: Jun 04 2020 12:55AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज मागविताच अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जोवर या पदासाठी अर्ज केला जात नाही तोवर केवळ नावांची चर्चाच  असणार आहे.

शिक्षण क्षेत्रात सध्या ज्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विजय ककडे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे,  पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत, पदार्थविज्ञान विभागाचे डॉ. विजय फुलारी तसेच मुंबई विद्यापीठातील  डॉ. दिलीप शंकरराव पाटील यांची नावे चर्चेत पुढे आली आहेत.