Fri, Jul 19, 2019 15:40होमपेज › Kolhapur › माने आत्महत्या तपास सीआयडीकडे द्या

माने आत्महत्या तपास सीआयडीकडे द्या

Published On: Jan 02 2018 1:32AM | Last Updated: Jan 02 2018 1:08AM

बुकमार्क करा
शिरोळ : प्रतिनिधी

येथील राजाराम माने आत्महत्या  प्रकरणाचा तपास पुणे सीआयडीकडे सोपवावा, पाचवा शिंदे नामक संशयितास अटक करावी, या मागणीसाठी  माने यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तत्पूर्वी मोर्चेकर्‍यांनी अचानक पवित्रा बदलून शिरोळ-जयसिंगपूर  मार्ग रोखून  तीन तास  ठिय्या मारला.दरम्यान, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, तहसीलदार गजानन गुरव यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून व्हावा, असे जिल्हा पोलिस प्रमुखांचे लेखी पत्र दाखविल्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित केले 

शिरोळ येथील शिवाजी चौकातून  मोर्चास प्रारंभ झाला. घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आला येथे अचानक मोर्चाधारक यांनी रस्त्यावर ठिया मारला. तहसील कार्यालयापासून प्रमुख मार्गावरील वाहतूक शिवाजी चौक ते श्री दत्त साखर कारखान्यापर्यंत अशी वाहतूक ठप्प झाल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली.तपास अधिकारी कुमार कदम यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मोर्चेकर्‍यांनी करून हा तपास  सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी केली.