Fri, Jul 19, 2019 05:10होमपेज › Kolhapur › जयसिंगपूर: ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

जयसिंगपूर: ट्रॅक्टर- दुचाकीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Published On: Jan 31 2018 9:01PM | Last Updated: Jan 31 2018 9:01PMजयसिंगपूर : प्रतिनिधी    

जयसिंगपूरजवळील चौंडेश्वरी सुतगिरणीसमोर ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगली- कोल्हापूर महामार्गावर टॅक्टरने मोटारसायकल आणि मोपेडला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. 

बारवाड तालुका चिकोडी येथील जितेंद्र तुळशीदास जाधव (वय ३५) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. जाधव यांचे मेहुणे विनायक भूपाल शिंदे (वय २३) रा. चंदूर आणि अमर पवार जयसिंगपूर हे  जखमी झाले आहेत. जाधव व त्यांचा मावस मेहुणा शिंदे हे दोघे सांगलीहून हुपरीकडे जात होते. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टरविरुध्द दिशेने आल्याने हा अपघात झाला. जाधव यांचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात हवण्यात आला.