Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Kolhapur › मलकापूरजवळ अपघातात तारदाळचा युवक ठार

मलकापूरजवळ अपघातात तारदाळचा युवक ठार

Published On: Dec 27 2017 1:30AM | Last Updated: Dec 27 2017 1:10AM

बुकमार्क करा

मलकापूर : वार्ताहर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर शहराच्या हद्दीतील शाळी नदीजवळील पुलानजीक स्प्लेंडर गाडीस अज्ञात ऑक्टिव्हाने धडक दिली.  त्यानंतर स्प्लेंडरस्वार समोरून येणार्‍या एस.टी. च्या मागील बाजूस धडकून झालेल्या अपघातात संदीप दिलीप घोडके (वय 24, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) हा युवक जागीच ठार झाल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. शुभम सागर डांगे व मयत संदीप घोडके हे दोघेजण आपल्या पत्नींना घेऊन मोटारसायकलीवरून तारदाळ येथून गणपतीपुळ्याचे देवदर्शन आटोपून सोमवार (दि.25) रात्री घरी निघाले होते. मलकापूर (ता. शाहूवाडी) शहरातील शाळी नाक्यावरील एच. डी. एफ. सी. बँकेसमोर अज्ञात ऑक्टिव्हाने प्रथम शुभम डांगेच्या गाडीस ठोकर दिली,

त्यानंतर मयत संदीप घोडके याच्या ताब्यातील हिरो स्प्लेंडरलाही (एम.एच.09, इ.पी.8680) ला जोरदार धडक दिली. दरम्यान, कोल्हापूरहून रत्नागिरीकडे निघालेली एस.टी. क्र. (एम.एस.20, बी.एन. 2996) ला स्प्लेंडरस्वारला मागील बाजूस धडकून झालेल्या अपघातात संदीप घोडके पत्नीसह रस्त्यावर पडले. यात संदीपच्या डोकीस गंभीर दुखापत होऊन नाकातोेंडातून रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला. तर या अपघातात पत्नीस अजिबात दुखापत झाली नव्हती. अपघातस्थळी शाहूवाडीचे पो.नि. अनिल गाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ धाव घेतली. मृत संदीप घोडकेच्या शरिराचे शव विच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालयात करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पो.नि. अनिल गाडे करीत आहेत. या अपघातात मोटारसायकीचे सुमारे दहा हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.