Wed, Nov 14, 2018 16:41होमपेज › Kolhapur › मालेत मारामारी; दोघे जखमी

मालेत मारामारी; दोघे जखमी

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:10AM

बुकमार्क करा

कोडोली : वार्ताहर      

पन्हाळा तालुक्यातील माले येथे टी. व्ही. सेट टॉप बॉक्स बसविण्याच्या कारणावरून दगड व लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत प्रदीप ऊर्फ राहुल सर्जेराव गुरव (वय 32) व दिलीप शिवाजी राशिवडेकर (वय 33) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी किरण कांडगावकर व सदाशिव चौगले (रा. माले) यांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे, तर सुनील लोंढे हा फरारी झाला आहे. 

याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, टी. व्ही. चा सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी प्रदीप गुरव याच्याकडून सदाशिव चौगले याने पैसे घेतले होते. सेट टॉप बॉक्स न बसविल्याने प्रदीप गुरव याने पैसे परत मागितल्याने प्रदीप गुरव याला दगड व लोखंडी रॉडने तोंडावर जबर वार केला.

यावेळी भांडण सोडविण्यास आलेल्या दिलीप राशिवडेकर यालाही किरण कांडगावकर, सदाशिव चौगले व सुनील लोंढे यांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी कांडगावकर व चौगले या दोघांना कोडोली पोलिसांनी अटक केली, तर सुनील लोंढे हा फरारी झाला आहे.