Thu, Sep 20, 2018 01:59होमपेज › Kolhapur › मकरंद जोशी, मिलिंद कोळेकर निलंबित

मकरंद जोशी, मिलिंद कोळेकर निलंबित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी  

बदलीच्या ठिकाणी रुजू न झालेल्या व वारंवार गैरहजर राहणार्‍या दोन कर्मचार्‍यांना महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी सेवेतून निलंबित केले. वरिष्ठ लिपिक मकरंद मनोहर जोशी व लिपिक मिलिंद अनंत कोळेकर अशी निलंबितांची नावे आहेत. दोघांचीही खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले असून, त्यांना दररोज जलअभियंता कार्यालयात हजेरी देणे बंधनकारक केले आहे. 

प्रॉव्हिडंड फंड विभागाकडील वरिष्ठ लिपिक मकरंद जोशी यांची शहर पाणीपुरवठा विभागाकडे 4 जानेवारी 2018 रोजी बदली करण्यात आली होती. त्या आदेशानुसार जोशी यांच्याकडे प्रॉव्हिडंड फंड विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार  ठेवण्यात आला होता. मात्र, जोशी यांनी 1 फेब्रुवारीला दोन्ही विभागांकडील जबाबदारीचे काम सक्षमपणे करू शकत नाही, असे खुलाशामध्ये लिहून दिले होते. त्यानुसार 22 फेब्रुवारीच्या आदेशानुसार त्यांच्याकडील प्रॉव्हिडंड विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार काढून घेण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडील कार्यभार स्वीकारण्याबात जोशी यांना वारंवार कळवूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Makrand Joshi, Milind Kolekar,  suspended


  •