Fri, Apr 26, 2019 16:03होमपेज › Kolhapur › महावितरण अधिकारी लाच घेताना जाळ्यात

महावितरण अधिकारी लाच घेताना जाळ्यात

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 1:02AMइचलकरंजी : प्रतिनिधी

अर्पाटमेंटमधील वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना महावितरणचा उपकार्यकारी अभियंता रणजित बाळासाहेब पाटील (वय 43, रा. कसबा बावडा, मूळ रा. खोची, ता. हातकणंगले) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयात गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. 

गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर उमेश निशिकांत माळी (रा. काडापुरे तळ, इचलकरंजी) यांनी सहा महिन्यांपूर्वी शहरातील दोन अपार्टमेंटमध्ये वीज कनेक्शन मिळावे, याकरीता अर्ज केला होता. हे अर्ज पडताळणीसाठी पाटील याच्याकडे आले होते. नवीन कनेक्शन मिळावे यासाठी तक्रारदारने अनेकवेळा पाठपुरावा केला. पाटील याने दाद दिली नाही. कनेक्शन मंजुरीसाठी पाटील याने तक्रारदाराकडे 27 हजार रुपयांची मागणी केली होती.  तक्रारदाराने यामध्ये तडजोड करण्यास सांगितले. पाटील याने 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. तक्रारदार  पाटील  25 हजार रूपये देण्यासाठी कार्यालयात पोहोचला. लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पाटील याला रंगेहाथ पकडले.

दरम्यान, कसबा बावडा येथील पाटील याच्या निवासस्थानी लाचलुचपत पतिबंधक विभागाच्या पोलिसांनी झडती घेतली.