Fri, May 24, 2019 03:27होमपेज › Kolhapur › नोकर भरतीतील भ्रष्‍टाचाराविरोधात पुणे ते मुंबई लाँग मार्च

नोकर भरतीतील भ्रष्‍टाचाराविरोधात पुणे ते मुंबई लाँग मार्च

Published On: May 15 2018 3:47PM | Last Updated: May 15 2018 3:47PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील डमी रॅकेट प्रकरण, नांदेड पोलिस भरती, परिवहन निरीक्षक भरती आणि शिक्षक पात्रता परिक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत सरकारी नोकरी भ्रष्‍टाचार विरोधी संघर्ष समितीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या घोटाळ्यांची चौकशी करावी आणि गुन्‍हेगारांना शिक्षा द्यावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी १९ ते २४ मे दरम्यान पुणे-मुंबई लाँग मार्च आंदोलन करण्यात येणार आहे. 

पुण्यातील नदीपात्र चौपाटी, डेक्‍कन येथून पदयात्रेस सुरुवात होणार असून मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा धडकणार आहे. सरकारी नोकरीतील सर्व जागा लोकसेवा आयोगामार्फत भराव्यात, तसेच शिक्षक आणि प्राध्यापक भरतीही आयोगामार्फतच करण्यात यावी, अशा मागण्या समितीने केल्या आहेत.

No automatic alt text available. 

No automatic alt text available.

Tags :MPSC, job, government job, long march, recruitment fraud, kolhapur, pune, mumbai