Tue, Jun 18, 2019 19:20होमपेज › Kolhapur › आमदार आबिटकर ठरले कर्जमाफीचे 'लाभार्थी'

आमदार आबिटकर ठरले कर्जमाफीचे 'लाभार्थी'

Published On: Dec 15 2017 1:12PM | Last Updated: Dec 15 2017 1:12PM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

पात्र शेतक-यांना कर्जमाफी मिळत नसल्याच्या कारणास्तव विधिमंडळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान सुरू असताना, कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे कर्जमाफीचे लाभार्थी ठरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आमदारांना कर्जमाफी नाकारण्यात आली आहे. पण, कर्जमाफी जाहीर झालेल्यांच्या यादीत आमदार आबिटकर यांचे नाव आहे. आमतादर आबिटकर यांनीच याचा गौप्यस्फोट केला आहे. 

मुळात कर्जमाफीच्या निकषांनुसार खासदार, आमदारांसह त्यांच्या नातेवाईकांना कर्जमाफी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून २५ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे दुरध्वनीवरून कळविण्यात आले. तसेच जाहीर करण्यात आलेल्या यादीत अनेक शिक्षकांसह आमदार आबिटकर यांचेही नाव आले आहे. आमदार आबिटकर यांनीच हा प्रकार विधानसभेत आयत्या वेळच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करून निदर्शनास आणून दिला. 

कर्जमाफी पात्र लाभार्थ्यांपर्यंत खरोखरच पोहचती का याचे हे ढळढळीत उदाहरण असून, एखादा आमदाराचे अशा यादीत नाव येणे ही गंभीर बाब असल्याचे आमदार आबिटकर म्हणाले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे काम हे चुकीच्या पध्दतीने चालले असल्याचे हे उदाहरण असून, असा प्रकार पात्र शेतक-यांवर अन्याय करणारा असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.