Wed, Oct 16, 2019 21:09होमपेज › Kolhapur ›  मुरगूडच्या सरपिराजीराव तलावाजवळ उड्डाणपूल उभारू : आमदार मुश्रीफ

सरपिराजीराव तलावाजवळ उड्डाणपूल उभारू : आ. मुश्रीफ

Published On: Aug 14 2019 9:43AM | Last Updated: Aug 14 2019 9:05AM

आमदार मुश्रीफमुदाळतिट्टा : प्रतिनिधी  

मुरगूड-सेनापती कापशी मार्गावर सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावर उड्डाणपूल उभारू, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. आमदार मुश्रीफ यांनी मुरगूडात येऊन पूरस्थिती पाहणी करून पूरग्रस्तांना धान्य वाटप केले. 

यावेळी आमदार मुश्रीफ  म्हणाले, महापूर आल्यानंतर मुरगूडला बेटाचे स्वरूप येते. या समस्येच्या सोडवणुकीसाठी मुरगूड- सेनापती कापशी मार्गावर सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यावरील उड्डाणपुलासह निढोरी मार्गावरील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून, रस्त्याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करू. तसेच मुरगूड-निपाणी आंतरराज्य मार्गावर शिंदेवाडी जवळ ओढ्यावरील पुलाची उंची वाढवू. मुरगूड - कुरणी दरम्यान वेदगंगा नदीवरील नव्या पुलाच्या बांधकामासाठीही प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.

माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, दलित मित्र प्रा. डी. डी. चौगले, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव चौगले, संपत कोळी, डॅा. सुनिल चौगले , दिग्विजय पाटील , रणजित सुर्यवंशी,  प्रकाश गोधडे, मंडल अधिकारी सौ एस. एस. भाट, गाव कामगार तलाठी विवेक पाटील, शिवाजी सातवेकर, रणजित सुर्यवंशी,  एम. डी. रावण , आबा खराडे, नामदेव भांदीगरे, संजय चौगले आदी प्रमुख उपस्थित होते. 

चिमगाव - गंगापूर पुलाची उंची वाढवा

मुरगूड नंतर पूरस्थिती पाहणीसाठी आमदार मुश्रीफ चिमगाव येथे आले होते. यावेळी ग्रामस्थांनी चिमगाव - गंगापूर दरम्यानच्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली. त्यामुळे महापूर आला तरी मुरगूडसह पंचक्रोशीतचा संपर्क गारगोटीशी व  पर्यायांने कोल्हापूरशी कायम राहील, असेही ग्रामस्थांनी सांगितले..