Thu, Apr 25, 2019 22:02होमपेज › Kolhapur › तर मग पायतान कशाला झिजवाला लावलासा...

तर मग पायतान कशाला झिजवाला लावलासा...

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:21PMखरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर आजरा तालुक्यातील पश्‍चिम भागातील एका शेतकर्‍याने कर्जासाठी एका नामवंत सहकारी संस्थेकडे कर्जमागणी अर्ज ठेवला होता. संस्थेच्या व्यवस्थापकाने, कर्ज मंजूर करतो. इतर बँकांचा व संस्थांचा ना हरकत दाखला घेऊन या, असे सांगितले. व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून संबंधित शेतकर्‍याने चार दिवस फिरून वेगवेगळ्या संस्थांकडून ना हरकत दाखला घेतला. दाखला घेऊन पुन्हा त्या व्यवस्थापकाकडे गेला असता व्यवस्थापकाने आपले कर्ज मंजूर झाले नाही, असे सांगताच त्या संतप्त शेतकर्‍याने इतर कर्मचारी व ग्राहकांसमोर थेट कर्ज देणार नव्हतासा तर मग पायातलं पायतान चालून चालून कशाला झिजवायला लावलासा? या संतप्त सवालाने उपस्थितांसह व्यवस्थापकाची चांगलीच भंबेरी उडाली; पण कळणार्‍यांनी मात्र गालातल्या गालात हसून त्या शेतकर्‍याला चांगलीच दाद दिली.