Sun, Jul 21, 2019 15:11
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › साक्षरतेचा टक्‍का वाढतोय!

साक्षरतेचा टक्‍का वाढतोय!

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 08 2018 12:36AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

‘चार पुस्तके शिकून मोठा झालास’ असे गौरवाने एखाद्याला म्हटले जायचे.  मागील जनगणनेनंतरच्या सात वषार्र्ंनंतर शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामुळे जिल्ह्यात साक्षरतेमध्ये सुधारणा झाली असून टक्‍का वाढत चालला आहे. दुसरीकडे ग्रामीण महिला साक्षरतेच्या टक्केवारीत पिछाडीवर असल्याचे उपलब्ध माहितीनुसार दिसून येते. 

शिक्षणाचा प्रवाह समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साक्षरता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात 1988 रोजी साक्षरता मिशन सुरू झाले. त्याची 1995 पासून जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली. 2009 पूर्वी प्रौढ साक्षरता अभियानाद्वारे ग्रामीण भागात प्रेरक व सहायक गावागावांत प्रौढ शिक्षणाचे धडे द्यायचे. परंतु, सप्टेंबर 2009 नंतर हे अभियान बंद झाले. निरंतर शिक्षण असे आता त्याचे नामकरण करण्यात आले आहे. 

जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील उपलब्ध आकडेवारीनुसार 2011 च्या जनगणनेत जिल्ह्याची साक्षरतेची टक्केवारी 81.51 टक्के आहे. पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 88.57 तर महिला साक्षरतेची टक्केवारी 74.22 आहे. ग्रामीण भागातील पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण 86.75 टक्के असून 69.73 टक्के महिला साक्षर असल्याचे दिसून आले आहे. पूर्वीची साक्षरतेची संकल्पना ही लिहिणे, वाचण्यापुरती मर्यादित होती. यामध्ये आधुनिक काळात बदल झाला आहे. सामाजिक, आर्थिक, संगणक व स्वच्छतेबाबतची साक्षरता या गोष्टी नव्याने पुढे आल्या आहेत. याचाही विचार करण्याची गरज आहे.