Tue, Jun 18, 2019 22:51होमपेज › Kolhapur › अकरा वर्षांत चार हजार सर्पांना जीवदान

अकरा वर्षांत चार हजार सर्पांना जीवदान

Published On: Aug 15 2018 1:23AM | Last Updated: Aug 14 2018 11:47PMभडगाव : एकनाथ पाटील

वेळ सकाळी पहाटे पाच वाजताची घरात इंडियन कोब्रा जातीचा विषारी सर्प (नाग) आला आहे. याची जाणीव देखील कुणाला झाली नाही. घरात येऊन सापाने कु. स्वप्निल अनिल खतकर (वय 23, रा. भडगाव, ता. कागल) या युवकाला काही क्षणात सापाने दंश केल्याचे समजताच घरातील सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सर्प विषारी असल्याने दवाखान्यात जाईपर्यंत स्वप्निल बेशुद्ध पडला. घरात सर्प आल्याने प्रचंड भीती होती आणखी पुढे अनर्थ टाळण्यासाठी तत्काळ गावातील तरुणांनी मुरगूड येथील सर्पमित्र सोमनाथ यरनाळकर आणि सुशांत कलकुटकी यांना बोलवले आणि विषारी सापाला खतकर यांच्या माळ्यावर कोणतीही इजा न करता फसफसनार्‍या, अंगावर हल्ला करण्याच्या दिशेने धाऊन येणारा, अस्वस्थ झालेला सहा फूट लांबीचा इंडियन कोब्रा (नाग) मोठ्या धाडसाने सर्प मित्रांनी पकडला आणि जंगलात सोडला व पुढचा अनर्थ टाळाला. जखमी स्वप्निलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेच भूतदयेचे काम मुरगूड परिसरातील शिवमचे कार्यकर्ते मनोभावे गेल्या 11 वर्षांपासून करत आहेत. या 11 वर्षांत त्यांनी आतापर्यंत सुमारे चार हजार सापांना जीवदान दिले आहे. 

सर्पाबद्दल लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. सर्प दिसता क्षणी मारण्याची मानसिकता आजही बहुतांश लोकांची आहे. परिणामी अनेक सर्पांना जीव गमवावा लागत असतो. परंतु, सन 2007 पासून कु. अदित्य खतकर (भडगाव), सोमनाथ यरनाळकर, सुशांत कलकुटकील, संग्राम मंडलिक, ओंकार हावळ, राहुल भोळे, संग्राम सोरप (मुरगूड), या युवकांनी  सर्प पकडल्यानंतर अनेक लोक स्वइच्छेने या सर्प मित्रांना पैसे देऊ करतात पण सर्पमित्र पैसे स्वीकारत नाहीत. सामाजिक कार्य व लोकांच्यावर येणारे अपघात प्रसंग व सर्पालाही मारले जात नाही, त्यामुळे या कामातून समाधान या सर्प मित्रांना मिळत आहे.

देवळात नको, दवाखान्यात जा

सर्पाने दंश केल्यावर जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा दवाखान्यात उपचार करणे गरजेचे असताना आजही विज्ञान युगात सर्पदंशग्रस्ताला देवळात नेऊन अंगारा, भंडारा लावला जातो. अशा वेळी जखमी व्यक्‍ती दगावण्याची भीती असते. त्यामुळे संबंधित जखमीला देवळात नको दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे आहे. असेही हे सर्प मित्र आवर्जुन सांगतात. यासर्व कामामागे शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख व सर्प तज्ज्ञ ज्ञानेश्‍वर म्हात्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन आहे.