Mon, Sep 24, 2018 12:58होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचे सुमेध वरपे बनले लेफ्टनंट

कोल्हापूरचे सुमेध वरपे बनले लेफ्टनंट

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

फुलेवाडी येथील अयोध्या कॉलनीतील सुमेध वरपे हे सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्‍त झाले. एनडीएमध्ये त्यांनी  यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतरच त्यांचे प्रशिक्षण  डेहराडून येथे झाले. तरुणांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगावे. देशसेवा आणि समाजात प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी अधिकारपदांमुळे प्राप्त होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

लेफ्टनंट वरपे यांचे मूळ गाव साबळेवाडी (ता. करवीर) हे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यापीठ हायस्कूल येथे झाले, तर पुढील शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले. वरपे यांचे वडील डी. पी. वरपे हे जिल्हा कृषी अधिकारी आहेत, तर आई शोभना या प्राथमिक शिक्षिका आहेत.