Sun, Jul 21, 2019 01:29होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ही शूरवीरांची भूमी : लेफ्टनंट जनरल सिंग

कोल्हापूर ही शूरवीरांची भूमी : लेफ्टनंट जनरल सिंग

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 10:52PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर ही शूरवीरांची भूमी असून जिल्ह्यातील जवानांनी भारत मातेसाठी प्राणाची बाजी लावली आहे. वीर जवानांच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात प्राधान्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना सर्वच शासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा, गुजरातच्या आर्मी सेंटरचे प्रमुख ए.व्ही.एस.एम, व्ही.एस.एम, जी.ओ.सी, एच.क्यू, एम.जी. अ‍ॅन्ड जी एरिया लेफ्टनंट जनरल विश्‍वंभर सिंग यांनी केले. 

टेंबलाईवाडी येथील 109 इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल.आय.कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे भारतीय सेनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी विविध कार्यक्रम व व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास चार हजारहून अधिक माजी सैनिकांनी उपस्थिती लावली होती. हा मेळावा दोन दिवस चालणार आहे. 

लेफ्टनंट जनरल विश्‍वंभर सिंग म्हणाले, शहीद जवांनाच्या मुलांना शासकीय व खासगी शाळेत प्राधान्य, द्यावे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर  सकारात्मक चर्चा झाली आहे.  लेफ्टनंट जनरल सिंग म्हणाले, माजी सैनिकांना उतारवयात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी राजस्थान, गोव्याच्या धर्तीवर  आर्मीच्या वतीने महाराष्ट्रातही मोबाईल व्हॅन (हॉस्पिटल) सुविधा सुरू करू, असा विश्‍वास देखील लेफ्टनंट जनरल सिंग यांनी  व्यक्‍त केला. 

यावेळी 30 वीर माता आणि पत्नीचा सन्मान सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. गिरगाव (ता. करवीर) येथील नामदेव पाटील व वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील पांडुरंग तुकाराम खोत या अपंगत्व आलेल्या माजी सैनिकांना दुचाकी प्रदान करण्यात  आली. मेजर जनरल प्रीती सिंग, माजी सैनिक कल्याण अधिकारी मेजर  सुभाष  सासने, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांचेही भाषण झाले. सुभेदार एन. एन. पाटील यांनी माजी सैनिकांच्या व्यथा मांडल्या.

यावेळी  कर्नल आर. एस. लेहाल (सेना मेडल), सुहास जतथकर,  कर्नल विजयसिंह गायकवाड, मेजर संजय शिंदे, ब्रिगेडियर पी. एस. राणा (एन.सी.सी ग्रुप कमांडर कोल्हापूर), लेफ्टनंट कर्नल मिलिंद शिंदे आदी उपस्थित होते. 

वीर पत्नी, वीर मातांचा सन्मान

वीर पत्नीमध्ये सुवर्णा पाटील, संगीता पाटील, शोभा उल्का, शर्मीला तुपारे, रूपाली तुपारे, सुवर्णा कदम, छाया पाटील, रूपाली भोळे, राजश्री  माने, अश्‍विनी  पाटील, पूनम  येलकर, संगीता  जाधव, अलका राजमाने, सुरेखा  पोवार, अर्चना बिरंजे, जयश्री  चौगले, मंगल  कदम, छाया  शिंदे, मनीषा  देसाई, सुवर्णा  मगदूम, वृषाली  तोरस्कर आणि निर्मला  निंगारे अशा 22 वीर माता आणि पत्नीचा गौरव करण्यात आला. तसेच मनीषा सूर्यवंशी, सुलोचना पाटील, शोभा माने, यशोदा पाटील, अनुसया भोसले, यमुनाबाई बागडी, आक्‍काताई साबळे, छाया इंगळे या आठ वीर मातांचा सन्मान करण्यात आला.