होमपेज › Kolhapur › चला शिकूया सूप्स आणि स्टार्टर्स...

चला शिकूया सूप्स आणि स्टार्टर्स...

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 09 2018 11:48PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे महिला व मुलींसाठी नेहमीच विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. 

कोल्हापूरमध्येही नेहमीच्या रोजच्या जेवणापेक्षा काही वेगळे नावीण्यपूर्ण पदार्थ अनेक हॉटेल्समध्ये सर्व्ह केले जातात. सूप आणि स्टार्टर्सही असेच काही हटके पदार्थ आहेत. नवीन पिढीबरोबरच मध्यमवयीन लोकांना या फूडची क्रेझ आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही सूप हा प्रकार पौष्टिक आहे. म्हणूनच कस्तुरी क्लबने नेहमीपेक्षा जरा हटके आणि वेगळे पदार्थ शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हा वर्कशॉप आज दि. 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल केट्री, शिवाजी पार्क, कोल्हापूर येथे होईल. हॉटेल केट्रीच्या नामवंत शेफकडून या रेसिपी शिकविल्या जाणार आहेत. या वर्कशॉपमधून लेमन कोरिएंडर सूप, बटन मशरूम सूप, थाई जिंजर कोकोनेट सूप तसेच स्टार्टर्समध्ये बेबीकॉर्न स्टिक्स, शांघाई पनीर, व्हेज फ्राईड वाँटन हे आणि अशा प्रकारचे अनेक पदार्थ शिकता येणार आहेत. 
हॉटेलप्रमाणेच घरच्या घरी हे पदार्थ कसे बनवायचे याचे प्रशिक्षण या वर्कशॉपमध्ये देण्यात येणार आहे. या वर्कशॉपसाठी नावनोंदणी आवश्यक आहे व  प्रवेश मर्यादित आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क - टोमॅटो एफ.एम., वसंत प्लाझा, बागल चौक, कोल्हापूर. फोन नं. 8805007724, 8805024242.