Wed, Sep 19, 2018 09:30



होमपेज › Kolhapur › तिच्या पंखाना बळ देण्यासाठी..स्वसंरक्षणाचा ‘प्रयोग’ (Video)

तिच्या पंखाना बळ देण्यासाठी..स्वसंरक्षणाचा ‘प्रयोग’ (Video)

Published On: Apr 16 2018 5:34PM | Last Updated: Apr 16 2018 5:34PM



कोल्हापूर : प्रतिनिधी

तिच्या संरक्षणासाठी...तिच्या पंखात बळ देण्यासाठी...तिचा आत्मविश्‍वास द्विगुणीत करण्यासाठी दैनिक पुढारी संचलित प्रयोग फाऊंडेशन कटिबध्द झाले आहे. मुलींना स्वयंनिर्भयतेने जगता यावे यासाठी त्यांना जुदो कराटेच्या माध्यामातून स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. आज अशाच एका ‘प्रयोगा’तून फाऊंडेशनच्यावतीने बालकल्याण संकुलातील सर्व मुला मुलींसमोर स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच संकुलातील सर्व मुलींना पुढील दोन महिने जुदो कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे कबूल करीत स्वयंनिर्भय बनन्याचे बळ प्रयोग फाऊंडेशनने दिले आहे.

स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आलेल्या संकटाचा प्रतिकार कसा करायचा, प्रतिकार करताना कोणती काळजी घ्यायची, स्वत:च्या शरीराला इजा होवू न देता प्रतिकार कसा करायचा या सर्व बाबींचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांमार्फत प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. संकुलातील केवळ मुलीच नाही तर मुलांनीही प्रयोग फाऊंडेशनच्या या उपक्रमाचा लाभ घेतला. अत्यंत कुतुहलाने सर्व मुलींनी प्रत्यक्षिके पाहिली. अनेक मुलींना हे सर्व नवे होते. पण याचे प्रशिक्षण आता आपल्यालाही दिले जाणार आहे हे कळाल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर आनंद आणि आत्मविश्‍वास झळकला. 

यावेळी बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह पद्मा तिवले, अधिक्षक पी के डवरी, अधिक्षक कांचन हेब्बाळकर, अधिक्षक नजीरा नदाफ, अधिक्षक द्रौपदी पाटील आदींची उपस्थिती होती. प्रयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर कुराश असोसिएशनचे प्रशिक्षक शरद पवार यांनी जुदो कराटेचे प्रात्यक्षिक दिले. यावेळी शिला खोत व कोल्हापूर कुराश असोसिएशनच्याशितल रसाळ, रुद्वी शृंगारपुरे, प्रियांका पाटील, पार्थ पाटील, आकाश चिले आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. 

Tags : balkalyan sankul, children ,  self-defense , Lessons, Foundation,  pudhari