Fri, Jul 19, 2019 13:26होमपेज › Kolhapur › सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरात व्यापाऱ्याची आत्महत्या

सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरात व्यापाऱ्याची आत्महत्या

Published On: Aug 03 2018 6:50PM | Last Updated: Aug 03 2018 6:50PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

तेल उद्योगासाठी सांगली येथील खासगी सावकारांकडून घेतलेले पैसे परत दिले नसल्याने 'पैसे दे अन्यथा आत्महत्या कर' असे म्हणणाऱ्या सावकारांच्या छळाला कंटाळून उमेश रामेश्वर बजाज (वय ४७ रा. माळी कॉलनी, टाकाळा) या व्यापाऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी, टाकाळा येथे राहणारे उमेश बजाज व त्यांच्या भावाने सांगलीतील माधवनगर भागात खाद्य तेलाचा उद्योग सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांनी सांगलीतील काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैशाची उचल केली होती. व्‍यवसायात मंदी असल्याने त्यांना पैसे परत करणे शक्य झाले नाही. सहा महिन्यांपासून सावकारांनी मुद्दल व व्याजाची रक्कम परत मागणीसाठी तगादा लावला होता. तेव्हा या बजाज बंधूंनी सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, मात्र पैशाची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला पैसे देतो असे सांगितले होते.