Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Kolhapur › थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजना सोडत आज

थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजना सोडत आज

Published On: May 31 2018 1:38AM | Last Updated: May 30 2018 11:20PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ आयोजित थ्री स्टार धूमधडाका वाचक बक्षीस योजना मालिकेतील तिसर्‍या महिन्यासाठीची बक्षीस सोडत शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी (दि.31 मे) मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. ‘झटपट ड्रॉ.. झटपट निकाल व झटपट बक्षिसे,’ अशा स्वरूपाच्या 3 महिन्यांत 3 बक्षीस सोडती, असे कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच 3 स्टार वाचक बक्षीस योजनेंतर्गत झाल्याने या योजनेला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या योजनेतील पहिला व दुसरा ड्रॉ झाला असून, विजेत्यांना बक्षिसांचे वाटप झाले आहे.

या मालिकेतील अखेरच्या म्हणजे तिसर्‍या बक्षीस सोडतीकडे सर्व कोल्हापूरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. तिसर्‍या ड्रॉमध्ये ह्युंडाई ईऑन कार हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस असून, या कारचा भाग्यवान विजेता कोण ठरतो, याची उत्सुकता वाचकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये इतर आकर्षक बक्षिसांमध्ये गॅस शेगडी, क्‍लॉथ डोअर स्टँड, सीलिंग फॅन, व्हिसलिंग टी केटल, किचन एसएस कढई विथ लीड, ओऊट डोअर बगपक, उपयुक्‍त मसाला डबा, पोर्टबल बार्बेक्यू अशा हटके बक्षिसांचे मानकरी कोण ठरणार, याची वाचकांमध्ये उत्सुकता आहे.

या समारंभाची सोडत कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ. शोभा बोंद्रे, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, राजाकाका मॉलचे दीपक केसवानी, सारस इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीनिवास कुलकर्णी, ‘आसमा कोल्हापूर’चे अध्यक्ष संजय रणदिवे, ‘फेम’चे अध्यक्ष अमर पाटील, साई सर्व्हिसेसचे सरव्यवस्थापक सिद्धार्थ कोकणे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. त्यामुळे या आगळ्या वेगळ्या बक्षिसांचे मानकरी कोण ठरणार, याची वाचकांमध्ये उत्सुकता आहे. या कार्यक्रमासाठी वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.