Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Kolhapur › बाराशे व्यापार्‍यांना ‘एलबीटी’च्या नोटिसा

बाराशे व्यापार्‍यांना ‘एलबीटी’च्या नोटिसा

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 1:17AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेच्या वतीने एलबीटी (स्थानिक संस्था कर) वसुलीसाठी कोल्हापूर शहरातील बाराशे व्यापार्‍यांना बजावण्यात आल्या. महापालिकेच्या वतीने 8 ते 15 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पमध्ये हजर राहण्यासाठी या नोटिसा दिल्या आहेत. 

दरम्यान, सोमवारी 76 व्यापार्‍यांनी महापालिका प्रशासनाकडे कागदपत्रे सादर केली. यात प्रामुख्याने इलेक्ट्रिकल्स, टिंबर मर्चंट यांचा समावेश आहे. विविध असोसिएशनचे पदाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून माहिती घेत आहेत. अधिकारी व महापालिका नियुक्त सी.ए. पॅनेल उपस्थित राहून मार्गदर्शन व तक्रारीचे निराकरण करत आहेत. 15 जानेवारीअखेर अभय योजनेत समाविष्ट असलेल्या व्यापार्‍यांचे करनिर्धारण पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.