Sun, Jun 16, 2019 02:49होमपेज › Kolhapur ›  पोहण्यासाठी गेलेल्‍या मुलाचा विहिरीत बुडून मृत्‍यू 

 पोहण्यासाठी गेलेल्‍या मुलाचा विहिरीत बुडून मृत्‍यू 

Published On: Jun 01 2018 6:59PM | Last Updated: Jun 01 2018 6:58PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरूंदवाड येथील विवेक रावसाहेब मोहिते (वय.19) हा विहिरीत पोहण्यासाठी गेला असता, त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबतची वर्दी अमोल आप्पासाहेब मोहिते यांनी कुरूंदवाड पोलिसांत दिली आहे. ही घटना आज शुक्रवार दि १ जून या दिवशी घडली.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, विवेक मोहिते हा आपल्या मित्रासमवेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भैरेवाडी हद्दीतील भीमराव रामचंद्र पाटील यांच्या शेतातील विहिरीत आंघोळीसाठी गेला होता. यावेळी पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारल्यानंतर तो परत वर न आल्याने त्याचा शोध घेतला असता, त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला.