Fri, Sep 21, 2018 11:32



होमपेज › Kolhapur › लाटवाडीनजीक अपघात मामा-भाच्याचा मृत्यू

लाटवाडीनजीक अपघात मामा-भाच्याचा मृत्यू

Published On: Dec 04 2017 12:46AM | Last Updated: Dec 04 2017 12:46AM

बुकमार्क करा





कुरूंदवाड : वार्ताहर

डंपर व अ‍ॅपेरिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात महमदअरिस फिरोज मुल्ला (वय 4, रा. अब्दुललाट) या बालकासह त्याचा मामा हुजेफ हसन हारुगिरे (25, रा. अब्दुललाट) या दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत.

लाटवाडी (ता. शिरोळ) येथील शिरगावे मळ्यानजीक हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजता घडला. जखमींना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हसन नबीसो हारुगिरे (वय 58), राबिया  हसन हारुगिरे (50), फारुख हसन हारुगिरे (28) आणि कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतमधील  सौ. आसमा फिरोज मुल्ला (30), आशिया फिरोज मुल्ला (7) अशी जखमींची नावे आहेत.

वरील सर्वजण सदलगा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी अ‍ॅपेरिक्षातून(एम एच 09 ए सी 9587) जात होते. लाटवाडीनजीक शिरगावे मळ्यानजीक अब्दुललाटकडे जाणार्‍या डंपरशी (एम एच 09  बी सी 4363) रिक्षाची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर आक्रोश आणि किंकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनातून बाहेर काढून कोल्हापूरला पाठविले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आ. उल्हास पाटील, जि. प. सदस्य विजय भोजे घटनास्थळी भेट दिली. अपघाताची फिर्याद इरफान मन्सूर हारुगिरी (रा. अब्दुललाट) यांनी कुरूंदवाड पोलिसात दिली आहे.