होमपेज › Kolhapur › मटका अड्‍डयावर छापा, १२ लाखांचा मुद्‍देमाल जप्त

मटका अड्‍डयावर छापा, १२ लाखांचा मुद्‍देमाल जप्त

Published On: Jul 06 2018 7:04PM | Last Updated: Jul 06 2018 7:04PMकुरुंदवाड : प्रतिनिधी 

दत्तवाड ता.शिरोळ येथील मटका बुक्की उदय अप्पासाहेब पाटील याच्या बुकीवर व तीन पानी जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आला. यामध्ये 50 हजार रुपये रोख रकमेसह 1 चारचाकी, मोटारसायकल व  बुक्कीतील साहित्य असा 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 29 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार हे मटका बुकीवर छापा टाकल्यानंतर 3 पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यास जात असताना दोन संशयित आरोपींनी पोलिस उपनिरीक्षक केदार यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी झालेल्‍या झटापटीत दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले.

आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दत्तवाड येथे उदय पाटील यांच्या मटका बुकीवर छापा टाकला असता बुकींमध्ये 37 हजार रुपये रोख रकमेसह मटक्याचे साहित्य मिळून आले.या मटका बुकीच्या कार्यालयाच्या पाठीमागेच तीन पानी जुगार अड्डा चालू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 7 हजार रुपये रोख रक्कम व बुकी मालक उदय पाटील सह 16 जणांना ताब्यात घेतले आहे. या ठिकानाहुन 1चारचाकी,16 मोटारसायकल  कार्यालयातील साहित्य असा 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान दत्तवाड गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी ही कार्यालये असल्याने बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.