Mon, May 20, 2019 21:08होमपेज › Kolhapur › नादुरूस्‍त क्लोअरिंग गॅस सिलेंडरमुळे कुरुंदवाडला अशुध्द पाणी

नादुरूस्‍त क्लोअरिंग गॅस सिलेंडरमुळे कुरुंदवाडला अशुध्द पाणी

Published On: May 20 2018 4:43PM | Last Updated: May 20 2018 4:44PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

पालिकेच्या पाणीपुरवठ्यातील जलशुद्धीकरण करणारे क्लोअरिंग गॅस सिलेंडरच्या रेग्युलेटरमध्ये बिघाड झाला आहे. या कारणामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून क्लोअरिंग शुद्धीकरणा अभावी शहराला दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा प्रकार आज उघडकीस आला.

गेल्‍या काही दिवसांपासून कुरुंदवाड मध्ये दुषीत पाण्याचा पुरवठा होत आहे. रेग्युलेटर व गॅस पुरवठा करणारी दिशा दर्शविणारे मीटर ही खराब झाले आहे, तर गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपही टणक झाल्या आहेत.

पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांत रेग्युलेटरच्या दुरूस्तीबाबत कोणतीही उपाययोजना न राबवता पंचगंगा प्रदूषणाच्या नावाखाली काम चलाव ची भूमिका घेतल्याने हा प्रकार म्‍हणजे नागरिकांच्या आरोग्‍याशी खेळण्याचा प्रकार असल्‍याने  या अनागोंदी कारभाराबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे.