Tue, Jul 16, 2019 11:37होमपेज › Kolhapur › कुरूंदवाड : शेतात आढळली ११ फुटी मगर 

कुरूंदवाड : शेतात आढळली ११ फुटी मगर 

Published On: Jul 13 2018 6:59PM | Last Updated: Jul 13 2018 6:59PMकुरूंदवाड : प्रतिनिधी 

सैनिक टाकळी ता.शिरोळ येथील मनोहर काकासो पाटील यांच्या शेतातील कमत नावाच्या ओढ्‍यात ११ फूट लांबीची नर जातीची अजस्त्र मगर मिळून आली. रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी ही मगर पकडून वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या स्वाधीन केली आहे.

मनोहर पाटील यांच्या शेतालगतच कृष्णा, दूधगंगा नदीचे पात्र आहे. या लगतच कमत ओढा आहे. याठिकानी पाटील गेले असता त्‍यांना आपल्‍या शेतात ११ फुट लांबीची अजस्‍त्र मगर दिसली. याची माहिती त्‍यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना कळवली. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्‍थळी दाखल होत या मगरीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्‍न केला. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या मगरीच्या अंगावर सुती पोते टाकून दोराने या मगरीला जखडून बांधून ठेवले यानंतर वनरक्षक एस.एस पवार यांनी ही मगर ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीनंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरक्षित स्थळी मगरीला सोडण्यात आले आहे.