होमपेज › Kolhapur › कुरुंदवाड : पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले जनावरांचे प्राण

कुरुंदवाड : पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवले जनावरांचे प्राण

Published On: Jul 20 2018 5:14PM | Last Updated: Jul 20 2018 5:14PMकुरुंदवाड : प्रतिनिधी

कुरुंदवाड येथील जुना शिरोळ रस्त्यावर पाणी आल्याने काही शेतकऱ्यांच्या गोठ्यातील 8 म्हैशी, 9शेळ्या, 2गाई पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरुपरित्या पाण्यातून बाहेर काढल्या.

दरम्यान गोठ्यात आलेल्या पाण्यात भिजलेल्या शेळ्यांचा थरकाप उडाला होता. व जनावरांनी आक्रोश मांडला होता.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रात्रीतून सहा इंचाने वाढ झाल्याने आज सकाळी साडेसहा वाजता सुमारास शिरोळ रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने मनोहर केनवाडे,अाण्णाप्पा बेलवाडे,स्वप्नील मुदगल यांच्या जनावरांच्या गोठ्यात ही पाणी शिरल्याने  या पाण्यातून जनावरे काढायची कशी हे शेतकऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले होते.

सामाजिक कार्यकर्ते रणजित डांगे   पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील सचिन कांबळे,शशिकांत कडाळे,मिरासाहेब मुल्ला,नंदकुमार चौधरी,गौस मानगावे यांनी धाडसाने पाण्यातून जाऊन सदरच्या जनावरांना पाण्याबाहेर  काढले.