Fri, Jul 19, 2019 20:05होमपेज › Kolhapur › ‘क्षीरसागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी’

‘क्षीरसागर यांनी जपली सामाजिक बांधिलकी’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवसेना पक्ष हा 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करणारा पक्ष आहे. ही समाजकारणाची बांधिलकी आ. राजेश क्षीरसागर यांनी जपत अपंग व महिलांसाठी ई-रिक्षाचे वाटप केले ही कौतुकास्पद बाब आहे, असे  गौरवोद‍्गार  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. आ. क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त  शनिवार पेठ शिवालय येथे कार्यक्रमात ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कट्टर हिंदुत्वाची प्रचिती  आली. क्षीरसागर  यांचा  वाढदिवस आणि दौरा हा योगायोग आहे. आ. क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त ई-रिक्षाचे वाटप झाले. ई-रिक्षा म्हणजे पर्यावरणपूरक रिक्षा. सध्या राजधानी दिल्‍लीतील राजकीय प्रदूषण नाही; पण पर्यावरणातील प्रदूषण वाढले आहे, कोल्हापुरात ते वाढू नये, यासाठी ई- रिक्षा हा चांगला पर्याय कोल्हापूरकरांनी निवडला आहे, याचे ठाकरे यांनी कौतुक केले. यावेळी महापौर सौ. हसिना फरास, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, अरुण दुधवडकर, प्रा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर व शिवसैनिक उपस्थित होते. 

शिवसैनिकांच्या वतीने श्री अंबाबाई देवी व कसबा बावडा येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात अभिषेक करण्यात आला. कसबा बावडा येथील विभागीय कार्यालयात केक कापला. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. शिवसेना शहर फेरीवाले संघटनेच्या वतीने अंबाबाई दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप झाले. मिरजकर तिकटी येथील अंधशाळेत मुलांसाठी स्नेहभोजन, सीपीआर अभ्यगत समितीच्या वतीने सीपीआरमधील रुगणांना फळे वाटप करण्यात आली.