कोल्‍हापूर : कोथळीतील जवान सतीश वायदंडे सिक्‍कीममध्ये शहीद     

Last Updated: Apr 10 2020 2:22PM
Responsive image


जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) :  पुढारी वृत्तसेवा        

कोथळी (तालुका शिरोळ) येथील जवान सतीश सोनाप्पा वायदंडे (वय 36 ) हे शहीद झाले आहेत. ते सिक्कीम येथे 758 बीआरटीएफ (बॉर्डर रोड टास्क फोर्स) मध्ये सेवेत होते. 

सेवेत असताना गुरूवारी मध्यरात्री त्यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचे समजते. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यापर्यंत आणि तिथून पुढे रूग्णवाहिकेतून आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.