Wed, Jun 26, 2019 17:50होमपेज › Kolhapur › कोल्हापूरकरांनी एकोपा जपावा : संभाजीराजे

कोल्हापूरकरांनी एकोपा जपावा : संभाजीराजे

Published On: Jan 04 2018 1:20AM | Last Updated: Jan 04 2018 1:20AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवछत्रपती, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे राज्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. यामुळे येथे सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहात आहेत.  कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना निश्‍चितच निंदनीय आहे. इतिहासातील घटनांना जातीयतेचा रंग देऊन आज जर कोणी सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.

सर्वसामान्य बहुजन समाजाने राष्ट्रविघातक शक्तींंच्या हातचे बाहुले बनू नये. अशा बिकट प्रसंगी समाजाने धैर्याने आणि संयमाने पुढे गेले पाहिजे. जेव्हा समाज संयमाने वागतो तेव्हाच प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखणे सोयीचे होते. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन  खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकाद्वारे केले आहे.