Thu, Nov 15, 2018 22:09होमपेज › Kolhapur › विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सीपीआर चौकानजीक सीता कॉलनीत राहणार्‍या अभिजित बळवंत चव्हाण (वय 31, रा. माले, पन्हाळा) याने राहत्या खोलीत विष प्राशन केले. बुधवारी सकाळी साथीदाराच्या लक्षात ही बाब येताच त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

अभिजित भाडेकरू म्हणून राहत होता. तो एका मोबाईल कंपनीच्या केअर सेंटरमध्ये काम करत होता. बुधवारी सकाळी त्याने विष प्राशन केले. बेशुद्धावस्थेत  साथीदारांनी त्याला दवाखान्यात दाखल केले होते. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत करण्यात आली.