Sun, Mar 24, 2019 23:05
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › डॉ. वीरेंद्र तावडेचा जामिनासाठी अर्ज

डॉ. वीरेंद्र तावडेचा जामिनासाठी अर्ज

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:50PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येतील संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या वतीने मंगळवारी न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला. अ‍ॅड. स्मिता शिंदे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. यावर शुक्रवार, दि. 22 डिसेंबरला सरकारी पक्षातर्फे म्हणणे मांडण्यात येणार आहे. 

कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून डॉ. वीरेंद्र तावडे याला 3 सप्टेंबर 2016 रोजी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. डॉ. तावडे पुण्यात झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील मुख्य संशयित आहे. डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणार्‍या सीबीआयचा साक्षीदार संजय साडविलकर याच्या जबाबातून डॉ. तावडेचे नाव पानसरे हत्येत पुढे आले होते. यामुळे तावडेला अटक झाली. कोल्हापुरात त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर पुन्हा त्याची पुण्यात रवानगी करण्यात आली. यानंतर डॉ. तावडेच्या वतीने पहिल्यांदाच जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे.