Mon, Aug 19, 2019 13:33होमपेज › Kolhapur › वारणा लुटीतील नवी माहिती होणार उघड

वारणा लुटीतील नवी माहिती होणार उघड

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:08AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

वारणानगर चोरीतील संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून बुलेट भेट घेणारा पोलिस कॉन्स्टेबल इरफान हमजुद्दीन नदाफ (वय 28, रा. वृंदावन कॉलनी, सांगली) शुक्रवारी पोलिसांत हजर झाला. सर्वोच्च न्यायालयाने  जामीन नाकारल्याने त्याला अटक झाली. इरफान नदाफच्या अटकेनंतर आता या चोरीतील आणखीन नवी माहिती समोर येण्याची शक्यता  आहे. वारणा शिक्षक कॉलनीतील चोरीनंतर मैनुद्दीन मुल्लाकडे सव्वातीन कोटींची रक्कम मिरजेतील बेथेलहेमनगरात ठेवली होती. या रकमेसह त्याला अटक करण्यात आली होती.

त्याच्याकडील चोरीच्या रकमेतून त्याने मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल इरफान नदाफला बुलेट भेट दिली होती. याप्रकरणात इरफानचा भाऊदेखील अडचणीत आला होता. या दोघांनाही मैनुद्दीनने बुलेट भेट दिल्या. इरफानची संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्लासोबत घनिष्ठ मैत्री असल्याचे समोर आले आहे. इरफानने आणखीन काही गुन्हे मैनुद्दीनकरवी करवून घेतले आहेत का? याचा तपास पोलिस करीत आहेत.