Wed, Jul 17, 2019 20:09होमपेज › Kolhapur › युनायटेड वॉरियर्स, मुंबई रश संघांचे विजय

युनायटेड वॉरियर्स, मुंबई रश संघांचे विजय

Published On: Dec 07 2017 2:13AM | Last Updated: Dec 07 2017 2:13AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

युनायटेड वॉरियर्स व मुंबई रश संघांनी ‘इंडियन वूमेन्स लीग’ फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. ईस्टर्न स्पोर्टिंग विरुद्ध क्रिप्शा यांच्यातील सामना 1-1 असा तुल्यबळ ठरला.   सकाळच्या सत्रात युनायटेडने स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई)चा 3-0 असा पराभव केला.  भागवती चाणू (33 मिनीट), रिनारॉय देवी (72 मि.), न्यूगोबी देवी (90 मि.) यांनी गोल केले. दुपारच्या सत्रात ईस्टर्न स्पोर्टिंगविरुद्ध क्रिप्शा यांच्यातील सामना पाहण्यासाठी फुटबॉलशौकीनांनी मोठी गर्दी केली होती.  ईस्टर्नकडून 14 व्या मिनिटाला युमनाम कमला देवीने गोल केला. या गोलची परतफेड क्रिप्शा संघाच्या दंग्मयी ग्रेसने 85 व्या मिनिटाला केली. 

सायंकाळच्या सत्रात मुंबई रश संघाने चांदणी स्पोर्टसला 3-1 असे पराभूत केले. 20 व्या मिनिटाला चांदणी स्पोर्टसच्या सुशमा हिने पहिला गोल नोंदवला. 48 व्या मिनिटाला मुंबई रशच्या सौम्याने सामना 1-1 असा बरोबरीत आणला. 51 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर नीशाने मुंबईला आघाडी मिळवून दिली. 62 व्या मिनिटाला सौम्याने तिसरा गोल केला. गुरुवारी दि. 7 डिसेंबर रोजी सामन्यांना
सुटी असणार आहे. शुक्रवारी  दि. 8 डिसेंबर हा स्पर्धेचा शेवटचा दिवस  असेल.