Wed, Nov 13, 2019 13:44होमपेज › Kolhapur › देशात पासपोर्ट वितरणात कोल्हापूर अव्वल

देशात पासपोर्ट वितरणात कोल्हापूर अव्वल

Published On: Dec 29 2017 8:06PM | Last Updated: Dec 29 2017 8:04PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

पासपोर्ट वितरणात देशात महाराष्ट्रातील कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये राज्यातील तीन शहरे असून पिंपरी चिंचवड़ दुसर्‍या तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर आहे, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.

देशात २५१ केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून यातील पहिल्या टप्‍प्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील ५९ केन्द्रांपैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत. कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून २१ हजार ९५ पासपोर्टचे वितरण करण्यात आले. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड़ पासपोर्ट वितरण केंद्रातून २० हजार ८३ तर औरंगाबाद केंद्रातून १४ हजार ९७३ पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसुरु तिसर्‍या क्रमांकावर असून या केंद्रातून १६ हजार ४४६ आणि चौथ्या क्रमांकावर असणार्‍या भुज (गुजरात) केंद्रातून १५ हजार २८१ पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती मुळे यांनी दिली.