Fri, Apr 26, 2019 04:00होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. पाटणकर यांच्या बैठकीवर बंदी घाला

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. पाटणकर यांच्या बैठकीवर बंदी घाला

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 10:38PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी (दि. 21) बोलावलेल्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्ती आंदोलन’ विषयक बैठकीवर बंदी घाला, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलातर्फे शनिवारी शहर उपअधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर यांना देण्यात आले. बैठक घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे; पण धार्मिक तेढ निर्माण करणारी कृती होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाईल, असे आश्‍वासन डॉ. अमृतकर यांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दिले. 

 शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच बैठक घेण्यावर कोणावरही बंदी घालता येणार नाही. मात्र, त्याठिकाणी कोणतेही धार्मिक तेढ निर्माण करणारे कृत्य होणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासन घेईल. तसेच बैठक आयोजकांनाही याबाबत पूर्व सूचना दिली जाईल, अशी माहिती दिली.  मंदिराचे पावित्र्य जपा : अंबाबाई पुजारी हटाव समिती दरम्यान, अंबाबाई पुजारी हटाव समितीच्या सदस्यांनीही शहर उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांची भेट घेतली. मंदिराचे पावित्र्य राखले जाईल, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी आंदोलने होऊ नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात  आली.