Fri, Feb 28, 2020 17:20होमपेज › Kolhapur › महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा संघ जाहीर

महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा संघ जाहीर

Published On: Dec 07 2017 2:10AM | Last Updated: Dec 07 2017 1:17AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खुल्या गटातून कोल्हापूरच्या महेश वरूटे, कौतुक डाफळे, उदयराज पाटील, सचिन जामदार यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे 60 कुस्ती अधिवेशन भूगाव (जि. पुणे) येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर शहर-जिल्हा तालीम संघातर्फे राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात निवड चाचणी घेण्यात आली. यानंतर मंगळवारी निवडलेला संघ जाहीर करण्यात आला.  जाहीर झालेला संघ असा : 55 किलो : अभि जित पाटील (बानगे), विठ्ठल कांबळे (कोगे). 60 किलो : सद्दाम शेख (दर्‍याचे वडगाव), रवींद्र लाहार (मौ. सांगाव). 63 किलो : विक्रम कुराडे (नंदगाव), विशाल कोंडेकर (मुरगूड). 67 किलो : प्रीतम खोत (आणूर), शुभम कोंडेकर (मुरगूड), 72 किलो : सागर पाटील (खुपिरे), सागर राजगोळकर (कोवाड). 77 किलो : सुभाष पाटील (साके), वैभव तेली  (बानगे). 

82 किलो :  शिवाजी पाटील (बानगे), सतीश आडसुळ (निढोरी). 87 किलो : वैभव पाटील (पाडळी खुर्द), हृषिकेश पाटील (कांदवडे). 86 किलो : हृषिकेश पाटील (राशिवडे बुद्रुक), अतुल डावरे (बानगे), सरदार सावंत (आमशी), बाबासाहेब राजगे (आरे). 90 किलो :  ऋतुराज  राऊत (कुडित्रे), अतुल माने (वडणगे), 92 किलो : रोहन रंडे (निढोरी), धनाजी पाटील (देवठाणे), श्रीमंत भोसले (मिणचे), अभिजित भोसले  (शित्तूर).  97 किलो : विजय  पाटील (पाडळी खुर्द), अजित पाटील (सावे), ओंकार भातमारे (इंगळी), अरुण बोंगार्डे (बानगे). ‘महाराष्ट्र केसरी’ साठीच्या गटात महेश वरूटे (रणदिवेवाडी, मोतीबाग तालीम), कौतुक डाफळे (मूळचा पिंपळगाव, काका पवार कुस्ती प्रशिक्षण केंद्र, पुणे), उदयराज पाटील (अर्जुनवाडा, मोतीबाग तालीम), सचिन जामदार (कोपार्डे, गंगावेश तालीम) यांचा समावेश आहे. ग्रीको रोमनमध्ये वैभव पाटील (पाडळी खुर्द), ऋषिकेश पाटील (कांदवडे). 97 किलो :  ऋतुराज राऊत (कुडित्रे), अतुल माने (वडणगे). 130 किलो : कुमार  पाटील (शित्तूर), अब्दुल पटेल (औरवाड).