होमपेज › Kolhapur › कोल्हापूर संघाला विजेतेपद

कोल्हापूर संघाला विजेतेपद

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 12:48AM

बुकमार्क करा
तेर : प्रतिनिधी

राज्यस्तरीय नौकानयन (कयाकिंग अँड कनोईंग) राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूरचा संघ अजिंक्य ठरला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा मध्यम प्रकल्पात (तेर, जि. उस्मानाबाद) या स्पर्धा झाल्या.
महाराष्ट्र राज्य कयाकिंग अँड कनोईंग असोसिएशन व जिल्हा संघटनेतर्फे 12 व्या राज्यस्तरीय स्पर्धेचासमारोप झाला. दुसर्‍या स्थानी सांगली व तिसर्‍या स्थानी नाशिकचा संघ राहिला. यात 22 जिल्ह्यांतील 706 खेळाडू सहभागी झाले होते.  आ. राणाजितसिंह पाटील व आ. मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले होते.

बेस्ट पुरुष गटात आनंद परीट, महिला गटात लक्ष्मी ऊके, ज्युनियर बॉईज गटात द्विग्विजय पोवार व दर्शन पोवार, ज्युनियर गर्ल गटात अमृता पाटीत व गायत्री पाटील, सब ज्युनियर बाँईज गटात करण घुणके, सब ज्युनियर गटात सृष्टी गंगधर व आरती महाजन. बेस्ट कनोईंग पुरुष गटात सुलतान नुरखाँ देशमुख तर महिला गटात नितू शेंडे ज्युनियर बॉईज गटात द्वारकाधिश साहेबराव गुबाडे तर ज्युनियर गर्ल गटात मानसी सावंत, सबज्युनियर बॉईज जनार्दन माने, सब ज्युनियर गर्ल  धनश्री धोकटे विजेते ठरले.