Thu, Sep 20, 2018 11:14होमपेज › Kolhapur › कोल्हापूर एस.टी. विभागातील 68 गाड्यांची भंगारात विक्री

कोल्हापूर एस.टी. विभागातील 68 गाड्यांची भंगारात विक्री

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 20 2018 10:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विभागात प्रथमच एस.टी.च्या 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या बसेस भंगारात काढून त्याची ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात आली. यातून 68 गाड्यांची विक्री करण्यात आली असून, 2 कोटी 37 लाख इतका महसूल एस.टी.ला मिळाली आहे. महामंडळाकडे असलेल्या भंगार मालाची विक्री करण्यासाठी महामंडळाच्या वतीने मान्यता ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.

या भंगारामध्ये 5 हजार नायलॉन व रेडियम टायस, 68 एस.टी.च्या बसेेस, 200 कमान पाटे, 25 टन अ‍ॅटो स्पेअर्स पार्ट, 150 टन रबर कटिंग असा माल ठेवण्यात आला होता. आलेल्या निविदा 16 जानेवारी रोजी उघडण्यात आल्या.  यातून या मालाची विक्री झाली. यातून महामंडळाला 2 कोटी 36 लाख 41 हजार 286 रुपये इतका महसूल मिळाला आहे.