Sat, Mar 23, 2019 18:20होमपेज › Kolhapur › २५०० टवाळखोरांविरुद्ध खटले

२५०० टवाळखोरांविरुद्ध खटले

Published On: Dec 30 2017 1:48AM | Last Updated: Dec 30 2017 1:13AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शाळा, कॉलेजसह सार्वजनिक ठिकाणी युवतींची छेडछाड, टिंगल करणार्‍या समाजकंटकांविरुद्ध निर्भय पथकामार्फत जिल्ह्यात विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. जानेवारी ते दि. 15 डिसेंबर 2017 या काळात 2 हजार 338 टवाळखोरांवर खटले दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस  अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिली.  विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या सूचनेनुसार टवाळखोरांविरुद्ध कारवाईसाठी निर्भया पथकासह स्थानिक पातळीवर विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, शहरासह जिल्ह्यात सहा निर्भया पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक कॉलेज, शाळांना भेटी देऊन तक्रारपेटी बसविण्यात आली आली आहे.

 पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांना कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थिनी प्रतिनिधीसह युवतींना विश्‍वासात घेऊन मनमोकळेपणाने चर्चा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वर्षभरात जिल्ह्यात 444 प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. निर्भया पथकाच्या कामाची पद्धत, मुलींना स्व:संरक्षणाचे शिक्षण, कायदेशीर तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असेही ते म्हणाले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका शेळके,भाग्यश्री कोळेकर यांच्या नियंत्रणाखाली पथकाची प्रभावी कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 
कॉलेज युवतींसह शाळकरी मुलींची ज्या ठिकाणी टिंगलटवाळी केली जाते, अशी 151 ठिकाणे निश्‍चित करून त्या ठिकाणी साध्या वेशातील अधिकारी, कर्मचार्‍यांची गस्त ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत छेडछाडीच्या गुन्ह्यांत काहीअंशी घट झाल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.