Thu, Jun 27, 2019 14:25होमपेज › Kolhapur › शिवाजी पेठेत कलागुणांचा गौरव

शिवाजी पेठेत कलागुणांचा गौरव

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 19 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी पेठेतील जुन्या खेळाडूंसह विविध क्षेत्रांत उल्‍लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उभा मारुती चौकात झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रायगडच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारून शिवमय वातावरण तयार केलेल्या उभा मारुती चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

रविवारी सायंकाळी पेठेतील जुने खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि विविध क्षेत्रांत उल्‍लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा उद्योगपती चंद्रकांत जाधव, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आप्पासाहेब वणिरे, अरुण नरके, बिभीषण पाटील, विजय मोरे, शाहू माने, अजित पाटील, बंडा साळुंखे, अजित निंबाळकर यांच्यासह जुन्या काळातील खेळांडूचा सत्कार करण्यात आला.

तर महेश सुतार, संताजी चौगले, बाबासाहेब कांबळे यांनाही गौरविण्यात आले. प्रजासत्ताकदिनी पंचगंगा नदीत बुडालेल्या टेम्पोतील प्रवाशांना वाचविणार्‍या जुना बुधवार पेठेतील कार्यकर्त्यांच्यावतीने संदीप देसाई यांनी सत्कार स्वीकारला. मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी उत्सवातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमास भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई, अशोक देसाई, सदाभाउ शिर्के, लालासाहेब गायकवाड, श्रीकांत भोसले, अजित खराडे, सचिन चव्हाण  यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश जरग यांनी सूत्रसंचालन  केले.